केंद्राने खताच्या किंमती कमी कराव्यात : अजित पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

केंद्राने खताच्या किंमती कमी कराव्यात : अजित पवार

बारामती : केंद्र सरकारने खताच्या वाढलेल्या किंमती कमी करुन शेतकऱयांना(Farmer) दिलासा द्यावा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार(U यांनी केले. बारामतीत (Baramati) झालेल्या आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी हे आवाहन केले.

खतांच्या वाढलेल्या किंमतीना सर्वस्वी केंद्र सरकारच जबाबदार असल्याने त्यांनी या किंमती कमी करण्यासाठी पावले उचलावीत, केंद्राने किंमती वाढविलेल्या असल्याने शेतक-यांना त्यांनी खते पुरवावीत, स्फुरद व पालाशच्या किंमती वाढलेल्या असल्या तरीही शेतक-यांनी युरीयाकडे वळू नये, असे आवाहन खरीप आढावा बैठकीत केलेले आहे असे ते म्हणाले.

हेही वाचा: पुण्यात मध्यरात्री सराईत गुन्हेगाराचा खून

पवार यांनी सांगितले, राज्याच्या काही भागात चक्रीवादळासह अतिवृष्टीचा इशारा मिळालेला असल्याने प्रशासन स्तरावर जी खबरदारी घ्यायची आहे, त्या संदर्भातील सर्व सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत. नुकसान होऊ नये तसेच प्राणहानी होऊ नये या साठी सर्वतोपरी काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

देशाला जितकी लस गरजेची आहे तितकी मिळत नाही, त्या मुळे भारत बायोटेक कंपनीला पुण्यात जागा उपलब्ध करुन दिली असून लवकरच तिथे लसनिर्मिती सुरु होईल, लस कमी असल्याने 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणाचा कार्यक्रम थांबवावा लागला आहे. पुरेशी लस उपलब्ध झाल्यानंतर गर्दी होणार नाही अशा पध्दतीने लसीकरण केंद्र वाढवली जातील, आणि 18 ते 44 वयोगटातील नागरिकांनाही लस उपलब्ध करुन दिली जाईल, अशी ग्वाही पवार यांनी दिली.

म्युकरमायसिस बाबत राज्य शासनाने वैद्यकीय तज्ज्ञांना माहिती दिली असून हा आजार का होतो याचीही माहिती मिळाली आहे, बारामतीतही प्रांताधिकारी व डॉक्टरांना या बाबतच्या सूचना दिलेल्या आहेत, खाजगी डॉक्टरांनाही या बाबतची माहिती देण्यास सांगितले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

टॅग्स :Pune News