esakal | पुण्यात मध्यरात्री सराईत गुन्हेगाराचा खून; बिबवेवाडीत घडला प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात मध्यरात्री सराईत गुन्हेगाराचा खून

पुण्यात मध्यरात्री सराईत गुन्हेगाराचा खून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : सहकारनगर येथील एका सराईत गुन्हेगाराचा टोळक्याने शुक्रवारी मध्यरात्री बिबवेवाडी येथे निर्घृण खून केला. याप्रकरणी 10 जणाविरुद्ध बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माधव हनुमंत वाघाटे (वय 28, रा. सहकारनगर) असे खुन झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सिद्धार्थ पालांगे याने फिर्याद दिली आहे. वाघाटे हा सहकारनगर येथील सराईत गुन्हेगार आहे.वाघाटे याने शुक्रवारी मध्यरात्री दिड वाजता बिबवेवाडी येथील ओटा स्किम येथे आला होता. त्यावेळी त्याने त्याचा मित्र सुनील खाटपे यास फोन केला. "माझी काही लोकांसमवेत भांडणे झाली असून मी ओटा स्किम येथे आलो आहे" असे सांगितले.

हेही वाचा: 'पृथ्वी कन्या'; श्रिया पिळगावकरच्या फोटोंनी वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

दरम्यान, फिर्यादी व वाघाटे हा तेथील चौकात खाटपेची वाट पाहात थांबले होते. त्यानंतर 8 ते 10 जणाचे टोळके तेथे आले. त्यांनी वाघाटे यास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोखंडी सळई, ट्यूब व बांबूने वाघाटेला जबर मारहाण केली. या घटनेत वाघाटे हा जबर जखमी झाला. त्यामध्ये त्याचा मृत्यु झाला.

हेही वाचा: पुणे RTO ला यंदाही फटका;१४ दिवसांत फक्त चार कोटी महसूल

loading image
go to top