....अन खुद्द अजित पवारांनीच कार्यकर्त्यांना केली विनंती....

मिलिंद संगई
Tuesday, 14 January 2020

राज्यमंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांची निवासस्थाने तयार झालेली नसल्याने अनेकांची तारांबळ होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही यात समावेश आहे. कार्यकर्त्यांनी समजून उमजून घ्याव  अस सांगण्याची वेळ खुद्द अजित पवारांवर आली.

बारामती - राज्यमंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांची निवासस्थाने तयार झालेली नसल्याने अनेकांची तारांबळ होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही यात समावेश आहे. कार्यकर्त्यांनी समजून उमजून घ्याव  अस सांगण्याची वेळ खुद्द अजित पवारांवर आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पवार यांना देवगिरी हे निवासस्थान मिळणार असल्याच्या बातम्या मध्यंतरी आल्या ख-या, मात्र अजूनही पवार यांचा मुक्काम प्रेमकोर्टमधील फ्लॅटमध्येच आहे. पवार यांच्या कडे होणारी गर्दी विचारात घेता हा फ्लॅट अत्यंत अपुरा असून त्या मुळे घर मिळेपर्यंत मुंबईला तातडीचे काम असेल तरच या असे सांगण्याची पाळी अजित पवार यांच्यावर आली. 

Video : रणगाड्यांच्या युद्धसरावचे आयोजन पहा कसे असते

बारामतीत नुकत्याच झालेल्या नागरी सत्कार समारंभाच्या वेळेस अजित पवार यांनी गंमतीने याचा उल्लेख केला. पवार म्हणाले, माझ्या घरी इतकी गर्दी होतेय की लोकांना डायनिंग टेबलच्या खुर्च्यांवरही नाईलाजाने बसवावे लागत आहे. घर आहे छोटे त्या मुळे सुनेत्राही वैतागून निघून आलीय.....अर्थात हे वाक्य अजित पवार गंमतीने म्हणाले, पण कार्यकर्त्यांनी माझी ही अडचण समजून उमजून घ्यावी असे ते मिश्कीलपणे म्हणाले. 

पुणे शहरात प्राणांतिक अपघातात १८ टक्‍क्‍यांनी घट

पवार यांच्याकडे राज्याच्या कानाकोप-यातून मुंबईला विविध कामांच्या निमित्ताने येणा-यांची संख्या लक्षणीय असल्याने बारामतीकरांनी मुंबईत कामासाठी येऊ नका, फोनवरच काम सांगा असे सांगत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना घराची अडचण समजून घेण्याचे आवाहन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar appeals to activists