
पुणे : शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याशिवाय द्राक्ष शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आर्थिक रसद कमी पडू देणार नाही. दहा अश्वशक्ती क्षमतेच्या कृषिपंपांची मर्यादित संख्या असेल तर वीजबिल माफीबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत मार्ग काढला जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.