पुणे : पुरंदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पूर्वी निर्धारित केलेले दोन हजार ६७३ हेक्टर जमिनीचे क्षेत्र कमी केले आहे. त्यामुळे या क्षेत्रात एकही गाव जात नाही, असे सांगून बाधित शेतकऱ्यांचे शक्यतो त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याचा विचार आहे. त्यांना योग्य मोबदला दिला जाईल, कोणालाही वाऱ्यावर सोडण्यात येणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिले.