Ajit Pawar expressing gratitude to Sharad Pawarat Baramati
Sakal
बारामती : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दलही अजित पवार यांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त केल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकड़ाट करत त्यांच्या या भूमिकेचे स्वागत केले. माझही साहेबांवर प्रेमच आहे, याचा पुन्हा एकदा अजित पवार यांनी पुनरुच्चार केला. बारामतीत गुरुवारी (ता. 13) बारामती नगरपरिषद व माळेगाव नगरपंचायतीच्या उमेदवारांच्या मुलाखतीनंतर झालेल्या मेळाव्यात एका कार्यकर्त्याने अजित पवारांना चिठ्ठी देत खासदारकीच्या निवडणूकीबाबत काही नमूद केले होते. तेव्हा या चिठ्ठीवर व्यक्त होताना अजित पवार यांनी बेरजेच्या राजकारणावर भर दिला.