
Ajit Pawar
sakal
पुणे : ‘‘शासनाने यापूर्वी गावांसाठी विविध योजना आणल्या. गावे स्वच्छ झाली, गावात चांगल्या सवयी लागल्या, सुधारणा झाली. मात्र, त्यात सातत्य राहत नाही. कामाचा दर्जा चांगला असला पाहिजे. योजनांचा लाभ थेट सामान्य माणसापर्यंत पोहोचला पाहिजे. ग्रामविकासात लोकसहभाग महत्त्वाचा आहे आणि त्यातूनच आदर्श व समृद्ध गावे घडतील,’’ अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.