Video : संभाजीराजे उपोषण करू नका, चर्चा करा; अजित पवारांचं आवाहन

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 January 2020

अधिकाऱ्यांची सकाळ सकाळी धावपळ!

- पोलिस वसाहतीच्या कामांची पाहणी

पुणे : मराठा समाजातील तरुणांसाठी सुरू करण्यात आलेल्या सारथी संस्थेसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती आंदोलन करत आहेत. त्यांना अजित पवार यांनी आंदोलन न करण्याचा सल्ला दिलाय. उपोषण करू नका, मुंबईत येऊन याविषयावर चर्चा करा, असं आवाहन अजित पवार यांनी केलंय. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय म्हणाले अजित पवार?

जिल्हा परिषदेतील पदासाठी इच्छुक सदस्यांच्या मुलाखती घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपोषणाविषयी अजित पवार यांना विचारण्यात आले. त्यावर अजित पवार म्हणाले, 'सारथी संस्थेबाबत दोन बाजू समोर येत आहेत. चुकीचं काही घडलं असेल तर, कुणाचीही गय केली जाणार नाही. चुकीचं घडलं असेल तर आम्ही बदल करू. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यांची माझी भेट झालेली नाही. पण, मी त्यांना आवाहन करतो की त्यांनी उपोषण करू नये. त्यांनी मुंबईत येऊन चर्चा करावी.'

अधिकाऱ्यांची सकाळ सकाळी धावपळ!

सध्या पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सकाळी लवकर काम करण्याच्या शैलीमुळं शासकीय अधिकाऱ्यांची धावपळ झाली. आज सकाळी सात वाजल्यापासूनच अजित पवार यांनी कामांचा धडाका लावला.

Video:अजित पवार म्हणतात, 'अधिकाऱ्यांनी लवकर उठलं तर, बिघडलं कुठं?'

पोलिस वसाहतीच्या कामांची पाहणी

अजित पवार यांनी आज शिवाजीनगर येथील नव्याने बांधकाम सुरू असलेल्या व जुन्या पोलिस वसाहतीची पाहणी केली. पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियाशी संवाद साधत त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी वसाहतीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

पुणे : उपमुख्यमंत्री होताच अजित पवार  'इन एक्शन मोड'

शरद पवार यांनी आम्हाला सकाळी लवकर उठून काम सुरू करायला शिकवलं आहे. त्यात आता माझा काय दोष? मी जर आठ दिवसांनंतर पुण्यात येणार असेन तर, अधिकाऱ्यांनी आठ दिवसांतून एकदा अधिकाऱ्यांनी लवकर उठलं तर काही बिघडणार नाही. 

- अजित पवार, उपमुख्यमंत्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar Commented about MP Sambhaji Raje