पुणे : उपमुख्यमंत्री होताच अजित पवार 'इन ऍक्शन मोड' (व्हिडिओ)

पुणे : उपमुख्यमंत्री होताच अजित पवार 'इन ऍक्शन मोड' (व्हिडिओ)

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शिवाजीनगर येथील नव्याने बांधकाम सुरू असलेल्या व जुन्या पोलिस वसाहतीची पाहणी केली. पोलिस कर्मचारी यांच्या कुटुंबियांशी संवाद साधत पोलिस कुटुंबियाला भेडसावणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी वसाहतीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, पोलिस सहआयुक्त डॉ रवींद्र शिसवे, अपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलिस उपायुक्त संभाजी कदम, पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे, पोलिस उपायुक्त पंकज देशमुख आदी उपस्थित होते.

पवार यांनी इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, इमारतीची पुनर्बांधणी यासंदर्भातील चर्चेसोबतच सद्यस्थितीत पोलिस वसाहतीचे सुरू असलेल्या कामांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. पोलिस वसाहत परिसरासोबतच पोलिस पाल्य वसतीगृहाचीही पाहणी केली. पोलिस वसाहतीचे अत्यंत उत्कृष्ट काम करून राज्यात आदर्श निर्माण करू, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com