अजितदादांकडून पवारसाहेबांसमोरच भाजपच्या महापौरांचे कौतुक...  

सकाळ वृत्तसेवा
Friday, 26 June 2020

शरद पवार यांना कोरोनाच्या उपाययोजनाबांबत माहिती देत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगरपालिका करत असलेल्या कामाचे कौतुक केले. तसेच,

पुणे : रोखठोक स्वभाव, अशी ओळख असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार हे चूक झालेल्याचा जागेवरच पाणउतरा करतात. तसेच, एखाद्याच्या चांगल्या कामाचे जाहीर कौतुकही करतात. त्याची प्रचिती आज पुणेकरांना आली. कारण, अजितदादांनी आज पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचे तोंड भरून कौतुक केले. तेही खुद्द ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासमोर. विरोधी पक्षाचे पदाधिकारी असतानाही अजितदादांनी केलेल्या या कौतुकाची चर्चा होत आहे. 

कोरोनाच्या धास्तीमुळे पुण्याबाहेर पडणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढले

पुणे शहरातील कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी खुद्द ज्येष्ठ नेते शरद पवार हे मैदानात उतरले आहेत. शहरातील कोरोना रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी त्यांच्या उपस्थितीत आयुक्त कार्यालयात बैठक सुरू आहे. विशेष म्हणजे या बैठकीवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या कामाचे जाहीर कौतुक केले.  

घराबाहेर जाऊन भाजी घेण्याचे आता टेन्शन संपले

या बैठकीवेळी शरद पवार यांना कोरोनाच्या उपाययोजनाबांबत माहिती देत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगरपालिका करत असलेल्या कामाचे कौतुक केले. तसेच, पुणे महापालिका मोठा आर्थिक भार उचलत आहे, असे सांगितले. त्यांनी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ हे कोरोना संकटाच्या काळात असलेल्या कामाचे कौतुक केले. तसेच, त्यांचे अभिनंदन केले. पुणे महानगरपालिकेवर भाजपचे एकहाती वर्चस्व आहे. तरीही अजितदादांनी पुणे महापालिका आणि महापौर मोहोळ यांचे कौतुक करताना हातचा राखला नाही.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अधिकाऱ्यांना कडक इशारा

या वेळी अजितदादांनी महापौरांचे कौतुक करत असताना अधिकाऱ्यांना मात्र कडक शब्दांत इशारा दिला. ते म्हणाले की, मी रोज सकाळी सात वाजता चार अधिकरयांना फोन करतो आणि आढावा घेतो. मग महापालिका आयुक्त, आणि जिल्हाधिकारयांनीही रोज आमदार, खासदारांना फोन कराच. मी अधिकरायांना फोन करतो; तेव्हा तुमही लोकप्रतिनिधींना करायलाच हवा. मला यापुढे तक्रार नको. एकत्र काम करा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar compliments Pune Mayor Murlidhar Mohol