पुणे : असे काय झाले की, भाजपचे 'हे' खासदार भडकले आयुक्तांवर...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 May 2020

मेअखेरला केवळ 3 हजार रुग्णांवर उपचार सुरू असतील. त्यामुळे पथकाचा अंदाज खोटा ठरेल, असे आयुक्त शेखर गायकवाड यांनी बैठकीत पालकमंत्र्यांना सांगितले.

पुणे : पुण्यात कोरोना पसरण्याची भीती मांडताना केंद्रीय पथकाने उपाय सूचविले होते; मात्र, पथकाच्या अंदाजानुसार रुग्ण राहणार नसल्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी पालकमंत्री अजित पवार यांना आकड्यानिशी दाखवून दिले. मात्र; त्यावर संतापलेल्या खासदार गिरीश बापट यांनी आयुक्त गायकवाडांच्या उघडपणे नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा- कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलंय आनंदनगर

"आयुक्त काय म्हणताय ? तुमचे मत केंद्राला कळवितो,' अशी तिरकस भूमिका बापट यांनी मांडली. पुण्यात कोरोनाची वाढ लक्षात घेता; मेअखेरपर्यंत 35 ते 40 हजार खाटांची व्यवस्था लागेल, अशी चिंता केंद्रीय पथकाने व्यक्त केली होती. 
पुण्यात नऊ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर रुग्ण संख्येत सतत वाढत गेली.

दरम्यान, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील कोरोनाचा आवाका पाहता महिनाअखेरीला साधारपणे 28 हजारापेक्षा अधिक रुग्ण सापडतील, असा अंदाज होता. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने मात्र भीती व्यक्त करीत शहरात 40 हजार खाट उपलब्ध करण्याची सूचना महापालिकेला केली होती. त्यामुळे पुणेकरांसह महापालिका प्रशासनही घाबरले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्यावर कठोर उपाय करीत आतापर्यंत सापडलेल्या 4 हजार रुग्णांपैकी सव्वादोन हजार रुग्ण बरे झाले आहेत. त्यात कोरोनामुक्तांचे प्रमाण वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मेअखेरला केवळ 3 हजार रुग्णांवर उपचार सुरू असतील. त्यामुळे पथकाचा अंदाज खोटा ठरेल, असे आयुक्त शेखर गायकवाड यांनी बैठकीत पालकमंत्र्यांना सांगितले.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यावर लगेचच आक्षेप घेत बापट यांनी आपली नाराजी व्यक्त केली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील सर्वपक्षीय आमदार, खासदार आणि पुणे- पिंपरी चिंचवड महापालिकेसह जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शंतनू गोयल यांच्या वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar convened a meeting of officials