
लवकरच, लवकरच, लवकरच...; मंत्रिमंडळ विस्तारावरून अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना टोला
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन बराच काळ लोटला आहे. मात्र अजूनही राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही, त्यामुळे विरोधकांडून एकनाथ शिंदे गट आणि सरकारवर टीका होताना दिसत आहे. दरम्यान, आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार दिल्लीतील सिग्नलशिवाय होईना झालाय असा टोला अजित पवारांनी लगावला आहे. आज ते पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते. (ajit pawar criticized to shinde and fadnavis govt)
हेही वाचा: Swaraj Screening: अमित शहांमध्ये मला सरदार पटेलांचे प्रतिबिंब दिसते - अनुराग ठाकूर
शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अजित पवार म्हणाले, यासंदर्भात काही विचारले असता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या तोंडातून लवकरच, लवकरच, लवकरच इतकेच शब्द येत आहेत. होईल, होईल.. पण कधी होईल याचे उत्तर यांच्याकडे नाही. महाराष्ट्रात चांद्यापासून ते बांद्यापर्यंत अनेक प्रश्न आहेत. अतिवृष्टी, पाऊस, शिक्षणाशी संबंधित पालक आणि विद्यार्थ्यांसमोरील अडचणी आहेत, याची जबाबादारी कोण घेणार ? असा सवाल पवारांनी केला आहे. त्यामुळे लवकरात लवकर याचा निर्णय व्हावा असंही त्यांनी सुचवलं आहे.
या सगळ्यावर शिंदे-फडणवीस सरकारकडून आम्ही दोघे आहोत, असे उत्तर दिले जाते. पण ही काम फक्त दोघांनी करण्यासारखी आहेत का याचा विचार होण्याची आवश्यकता आहे. या दोन्ही नेत्यांनी याचे आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असंही अजित पवारांनी सूचवलं आहे. पुढे ते म्हणाले, निवडणुकीसाठी सज्ज रहा. आज यांच्या हातात काहीही नाहीये, दिल्लीतून सिग्नल मिळाल्यानंतरच पुढच्या गोष्टी होणार आहेत, तोवर यांनी फक्त गप्पा मारायच्या आहेत. याआधी महाविकास आघाडी सरकारमध्ये महाराष्ट्रात आणि मुंबईत सर्व निर्णय व्हायचे,असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधलं आहे.
हेही वाचा: ED Enquiry: म्हाडा, आरोग्य आणि TET घोटाळ्याचा तपास आता ईडीकडे?
Web Title: Ajit Pawar Criticized To Shinde And Fadnavis Govt On Cabinet Expansion Without Delhi Single
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..