सातारारोड संशय दूर करा

सातारारोड संशय दूर करा
Published on: 

अजित पवार मृत्यू प्रकरणात नेमके काय घडले?

शशिकांत शिंदे; चौकशीला विलंब होत असल्याने संशय

सातारारोड, ता. १७ : अजित पवार यांच्या प्रकरणात नेमके काय घडले, याबाबतचे सत्य लवकरात लवकर समोर आले पाहिजे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी सीआयडी आणि सीबीआयमार्फत करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.

श्री. शिंदे म्हणाले, की आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलेल्या भावना योग्य असून, संबंधित विमान कंपनीच्या मालकावर कारवाई करावी आणि कोणालाही पाठीशी घालू नये. या प्रकरणात घातपात झाला असेल, तर दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. घटना घडून नऊ महिने उलटून गेले आहेत. चौकशीला विलंब होत असल्याने संशय वाढत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रोहित पवार यांनी केलेल्या मागणीप्रमाणे आमचीही पहिल्यापासून निष्पक्ष चौकशीची मागणी आहे. या प्रकरणातील सत्य जनतेसमोर आले पाहिजे, असेही शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले. संशयाचे धुके वाढवण्यापेक्षा सत्यता समोर येणे गरजेचे आहे. कोणाचा संबंध कोणाशी आहे, हे सुद्धा समोर येणे गरजेचे आहे. व्हीएसआर कंपनीचा मालक दोषी असेल, तर आणि तशी सिद्धता झाली, तर संबंधितावर निष्पक्षपणे कारवाई व्हावी, अशी मागणी आम्ही गेल्या नऊ महिन्यांपासून करत आहोत. रोहित पवार यांनी देखील तीच मागणी केलेली आहे, असेही श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
----
शशिकांत शिंदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.