

Wreckage of the Learjet 45 aircraft at Baramati airport following the fatal crash that claimed the life of Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar and five others.
esakal
Ajit Pawar Last Social Media Post : महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा धक्का बसला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांचा आज सकाळी बारामती विमानतळाजवळ विमान अपघातात निधन झाले. या भीषण अपघातात विमानातील सर्व सहा जणांचा मृत्यू झाला असून, त्यात अजित पवार यांच्यासह दोन वैमानिक, त्यांचा वैयक्तिक सुरक्षा रक्षक (PSO), वैयक्तिक सहाय्यक आणि फ्लाइट अटेंडंट यांचा समावेश आहे.