Ajit Pawar Funeral News Updates : अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पूर्ण, अश्रूंनी व जड अंतःकरणाने अखेरचा निरोप

Ajit Pawar Dies in plane crash LIVE Updates : महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावी भूमिका बजावणारे, ‘दादा’ म्हणून ओळखले जाणारे अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं आहे.
Ajit Pawar dies in plane crash

Ajit Pawar dies in plane crash

esakal

Updated on

बारामतीत अजित पवारांना अखेरचा निरोप, पार्थ-जय पवारांनी दिला अग्नी

अजित पवार अखेर अनंतात विलीन झाले असून पार्थ पवार आणि जय पवार लाडक्या बाबांना अग्नी दिला. अंत्यसंस्काराच्या वेळी परिसरात शोकाकुल वातावरण असून कार्यकर्त्यांचा आक्रोश सुरू आहे. पोलिसांकडून मानवंदना दिली जात आहे. या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण करत आहेत. संपूर्ण बारामती शहर शोकसागरात बुडाले असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com