पुणे - बंडगार्डन ते मुंढवा पूल या दरम्यान नदी काठ सुधारचे काम करताना शासनाच्या विविध विभागांच्या जमिनी महापालिकेच्या ताब्यात देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने तब्बल ११६ कोटी रुपयांची मागणी केली आहे. पण हा मुख्यमंत्र्यांच्या वॉररुमधील प्राधान्याने पूर्ण करण्याचा प्रकल्प आहे. त्यामुळे ही जागा नाममात्र दराने महापालिकेला हस्तांतरित करा असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.