Hinjewadi Traffic : दीर्घकालीन उपाययोजनांवर भर द्या; ‘पीएमआरडीए’तील बैठकीत उपमुख्यमंत्र्यांची अधिकाऱ्यांना सूचना
Ajit Pawar : हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना आखा आणि प्रशासकीय यंत्रणांनी समन्वय साधावा, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएमआरडीएच्या आढावा बैठकीत सांगितले.
पिंपरी : भविष्यातील अडचणी विचारात घेऊन दीर्घकालीन उपाययोजनांवर भर द्या, अशी सूचना उपमुख्यमंत्री तसेच पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता. २६) दिली. ‘पीएमआरडीए’तील आढावा बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली.