

माळेगाव : शिक्षणामध्ये सामर्थ आहे. शिक्षणामुळे विशेषतः मुली महिला स्वत:च्या पायावर उभा राहिल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यासाठी ग्रामीण भागात सामान्य कुटुंबातील मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातात. हे जरी खरे असले तरी समाजातील दानशूर लोकांनीही मुलींच्या शिक्षणाच्या चळवळीला अधिक बळकटी देण्यासाठी पुढे यावे. अर्थात तोच हेतू डोळ्यासमोर ठेवत सांगवीचे रहिवासी व मुंबईचे उद्योजक भारत रंगराव तावरे यांनी मुलींसाठी २५० सायकलींचे मोफत वाटप केले आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगवीत स्पष्ट केले.