...आम्हाला तलवारी मिळायच्या, आता ही गदा कुठं धरू; अजित पवारांची फटकेबाजी  

Untitled-3.jpg
Untitled-3.jpg

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राजकीय आखाड्यातील फटकेबाजी नेहमीच पाहायला मिळते, परंतू आज त्यांचे कुस्तीच्या आखाड्यातील आगळेवेगळे रूप पाहायला मिळाले. त्यांनी या आखाड्य़ात जोरदार फटकेबाजी केली.

पुण्यात पैलवान काका पवार यांच्या आखाड्यात या वर्षीच्या महाराष्ट्र केसरीं विजेते आणि उपविजेत्यांचा सत्कार करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार हे या सत्कारासाठी खास आखाड्यात आले होते. यावेळी त्यांनी जबरदस्त फटकेबाजी केली.  

अजित पवार म्हणाले, पैलवान काका पवार यांनी प्रथमच बिन लंगोट वाल्याचा सत्कार केला असेल. आणि सत्कारात दिलं काय तर गदा. आत्तापर्यंत आम्हाला तलवारी मिळायच्या.आता ही गदा कुठं धरू असा विचार करतोय तर हा फोटोग्राफर म्हणतोय दादा गदा वर धरा.. आता तुझ्या डोक्यात घालू का असं म्हणताच आखाड्यात एकच हशा झाला.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील सर्व वजनी गटातील विजेत्यांचा सत्कार अजित पवारांनी शाल-श्रीफळ देऊन केला. शासन मल्लांना मानधन वाढवून देईल असं आश्वासन देताना अजित पवारांनी दिलं. विजयाने हुरळून जाऊ नका पराभवाने खचू नका असं आवाहन ही अजित पवारांनी केलं.

महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरींना महिना 20 हजार रुपये मानधन सुरु करावे अशी मागणी काकासाहेब पवार यांनी केली. शरद पवारांची सुरक्षा काढली तर महाराष्ट्रातील पैलवानांची वानरसेना हजर असणार असंही काकासाहेब पवार म्हणाले. अजित पवार म्हणाले, राज्याचं निधीच वाटप करताना वेगवेगळ्या खेळातील खेळाडूंना पाठींबा देण्यासाठी आर्थिक मदत देणार. तालुक्याच्या ठिकाणी होणाऱ्या क्रीडा संकुलासाठी अर्थ संकल्पात तरतुर करणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.

आज, कात्रजच्या आंबेगाव खुर्दमधल्या आंतरराष्ट्रीय क्रिडा संकुलात महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर, उप महाराष्ट्र केसरी शैलेश शेळके आणि पोलीस उपअधिक्षक कुस्तीगीर राहुल आवारे यांचा सन्मान केला आणि या गुणवान खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या! 

प्रजेच्या हाताने लोकशाही मार्गाने जे सरकार येत त्या सरकाराने प्रजेसाठी काम करायचं असत. शाहू महाराजांनी राजाश्रय दिला. कुस्तीत काळानुरूप बदल आपल्याला करावे लागतील. खेळात जय पराजय होत असतात, त्यात खिलाडू वृत्ती जपायची असते. एक एक पैलवान तयार करताना किती कष्ट घ्यावे लागतात, किती खर्च करावा लागतो याची मला जाण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com