esakal | 'लसीकरण आपल्या दारी' कार्यक्रमाचे अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन | Katraj
sakal

बोलून बातमी शोधा

'लसीकरण आपल्या दारी' कार्यक्रमाचे अजित पवार हस्ते उद्घाटन

'लसीकरण आपल्या दारी' कार्यक्रमाचे अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कात्रज : 'लसीकरण आपल्या दारी' कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सर्किट हाऊस येथे करण्यात आले. कात्रजमधील प्रगती फाऊंडेशन आणि विलू पुनावाला मेमोरिअल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने घरोघरी जाऊन लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, 'मोठ्या प्रमाणावर आपण लसीकरण केंद्रे सुरु केली आहेत. परंतु तरीदेखिल स्लममध्ये राहत असलेल्या वर्गामध्ये लसीकरण करुन घेण्याची इच्छा कमी होताना दिसत आहे. म्हणून अशा उपक्रमांची गरज आहे.' त्यामुळे अग्रक्रम देऊन घरोघरी जाऊन लसीकरण करण्यांसाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही अजित पवार म्हणाले.

हेही वाचा: राजकारणात ‘शहरं’ ठरताहेत प्रभावशाली!

ही मोहिम ८ ऑक्टोबर पासून २१ ऑक्टोबरपर्यंत कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात राबविण्यात येणार असल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रतिक कदम यांनी दिली. माजी नगरसेविका भारती कदम आणि प्रतिक कदम यांच्या संकल्पनेतून कोरोनावर मात करण्यासाठी परिसर १०० टक्के लसीकरणयुक्त करण्यात येणार आहे. त्यासाठी परिसरातील प्रत्येक घरी जाऊन लस देण्यात येणार आहे. यावेळी नगरसेवक प्रकाश कदम, राकेश कामठे, सिरम इन्स्टिट्यूटचे डॉ. भूषण माणगावकर, डॉ. लजपतराय आर्य, मॅथ्यू चॅनडी यांच्यासह वेलफेअर मेडिकल फाउंडेशन आणि विलू पुनावाला मेमोरिअल हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते.

loading image
go to top