पुणे महापालिकेवर अजितदादांचे बारीक लक्ष : खा. डॉ. अमोल कोल्हे

Ajit pawar have close attention on Pune Municipal Corporation said MP Dr Amol Kolhe
Ajit pawar have close attention on Pune Municipal Corporation said MP Dr Amol Kolhe

कात्रज : पुणे महानगरपालिकेवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे बारीक लक्ष असून त्याबाबत विरोधकांनी काळजी करू नये. महापालिकेत राष्ट्रवादीच सत्ता येणार असल्याचे प्रतिपादन शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.

कात्रज परिसरातील सुखसागर नगर भाग १ करिता कात्रज कोंढवा रोड ते गंगा ओशियन सोसायटी पर्यंत ४०० मी.मी. व्यासाची स्वतंत्र पाण्याची एक्सप्रेस लाईन टाकणे, महावीर नगर ते प्रेरणा हॉस्पिटलपर्यंत ३०० मी.मी. व्यासाची स्वतंत्र पाण्याची एक्सप्रेस लाईन टाकणे आणि सुखसागर नगर भाग २ करिता कात्रज कोंढवा रोड ते खंडोबा मंदीरपर्यंत ४००मी.मी. व्यासाची पाण्याची स्वतंत्र लाईन टाकणे या कामांचे भूमिपूजन अंबामाता मंदिर चौकात कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. 

स्ट्रॉबेरीसह आता महाबळेश्वरची केशर ही लवकरच मिळणार
 
कोल्हे म्हणाले, 'विधानसभेच्या निवडणुकीत झालेला चमत्कार जनतेने बघितला असून ज्या पद्धतीने नगरसेवक प्रकाश कदम यांनी कामाचा झपाटा लावला आहे. असाच राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांचा कामाचा झपाटा आहे. हे काम होत असताना सर्व सामान्य जनतेचं काम असंच उभं राहिल्यामुळे पुणे महापालिकेचा निकालसुद्धा महाविकास आघाडी म्हणजेच राष्ट्रवादीच्या बाजूने लागणार आहे. महापालिकेत समाविष्ट होणार असलेल्या २३ गावांच्या विकासासाठी निधीची अकांडतांडव कशासाठी? असा सवालही कोल्हे यांनी उपस्थित केला. 

यावेळी नगरसेवक प्रकाश कदम यांनी त्यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला तर, मगराज राठी यांनी आपले आभार मानले. यावेळी माजी नगरसेविका भारती कदम, प्रतिक कदम, महेश कदम, सुधीर डावखर, रमेश सोनकांबळे, चंद्रकांत हंडाळ, चंद्रकांत कदम, रमेश कदम, अनिल ढवण, दिपक गुजर, अर्जुन निंबाळकर, पुनम पाटील, जितू चव्हाण, संजय खोपडे, संतोष बालवडकर, बाळासाहेब खंदारे, राकेश कामठे, बाळासाहेब कवडे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com