पुण्यात नवे निर्बंध? रुग्ण वाढल्यानंतर अजित पवारांची तातडीची बैठक

Ajit Pawar
Ajit Pawar sakal

राज्यातील कोरोना परिस्थिती गंभीर होत चालली आहे. दररोज ४० हजारांच्या पुढे रुग्ण सापडत असल्याने येणाऱ्या काळात आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढणार आहे. राज्यातील शाळा आणि महाविद्यालयं १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Pune Night Curfew)

तिसऱ्या लाटेत देखील मुंबई आणि पुणे हे कोरोना हॉटस्पॉट ठरले आहेत. गेल्या चोवीस तासात महाराष्ट्रात ४३ हजार २११ रुग्ण सापडले आहेत. तर पुण्यात हीच संख्या १० हजारांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज आढावा बैठक बोलावली आहे. (Ajit Pawar Holds corona review meeting in pune)

पुण्यातील सर्व रुग्णालयांच्या ओपीडी क्षमता फुल्ल

गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने होत असलेले बदल (Climate Change), अचानक वाढत असलेला गारठा, तसेच विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अनेक पुणेकर सध्या सर्दी, खोकला, घसादुखी, ताप आणि अंगदुखीने नागरिक हैराण झाले आहेत. त्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत असल्याने तपासणीसाठी रुग्णालयांमध्ये गर्दी होत असून खासगी रुग्णालयांसोबतच शासकीय रुग्णालयांच्या ओपीडी फुल्ल झाल्या आहेत.(Pune Corona Update)

राज्यात सुरू झालेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुंबई आणि पुणे ही दोन्ही शहरं पुन्हा हॉटस्पॉट ठरत आहेत. मुंबई खालोखाल पुण्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये ओमिक्रॉनच्या रुग्ण दुपटीचा वेगही वाढला आहे. त्यामुळे पुण्यातील परिस्थितीवर उपमुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक बोलावली आहे.

पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर निर्बंध आणखी कडक करायचे की नाहीत, याबाबत संबंधित बैठकीत निर्णय अपेक्षित आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. कौन्सिल हॉल या ठिकाणी पार पडणाऱ्या बैठकीत शहर आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते. तसेच अजित पवार प्रशासकीय अधिकाऱ्यांशी देखील चर्चा करणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com