बारामतीकरांचा नाद खुळा! अजित पवारांना हार घालण्यासाठी थेट क्रेनला लटकला कार्यकर्ता | Video Viral

ajit pawar
ajit pawarSakal
Updated on

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पाडून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांचे पहिल्यांदाच बारातमी येथे आगमन झाले. यावेळी बारामतीकरांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.

शहराच्या वेशीवर छत्रपती शिवाजी उद्यानापासून अजित पवार यांची उघड्या जीपमधून राष्ट्रवादीच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी एका कार्यकर्त्याने थेट क्रेनला लटकून अजित पवार यांना हार घातला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

दरम्यान, ठिकठिकाणी नागरिकांनी अजित पवार यांचे हार घालून स्वागत केले. जेसीबी मशीनच्या साहाय्याने अनेक ठिकाणी त्यांच्यावर फुलांची उधळण केली गेली. क्रेनद्वारेही त्यांना हार घातले गेले. अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळ व संजीवनी ग्रुपने क्रेनद्वारे हार घालण्याची व्यवस्था केली होती. पण त्यांच्या मिरवणुकीतील एका व्यक्तीला क्रेनला बांधून हार घालण्याचा प्रसंग चांगलाच चर्चेत आहे.

ajit pawar
Neeraj Chopra : नीरजने भाला फेकल्याचा तो ऐतिहासिक क्षण अन् कुटुंबियांचा जल्लोष | Video Viral

या सभेत काय म्हणाले अजित पवार?

"नरेंद्र मोदी यांच्याविरोधात मी सभा घेतली, बोललो हे मला मान्य आहे, पण आज तरी देशाची वाटचाल त्यांच्या नेतृत्वाखाली ज्या गतीने सुरु आहे, देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे, ही बाब विचारात घेता मला तरी मोदींना दुसरा पर्याय दिसत नाही" अशा शब्दांत अजित पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतुक केले. त्याचबरोबर महायुतीत जाण्यामागची भूमिका बारामतीकरांपुढे स्पष्ट केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Marathi News Esakal
www.esakal.com