esakal | घरकुलांसाठीच्या अनुदानात एक लाख रुपायांची वाढ करू : अजित पवार
sakal

बोलून बातमी शोधा

अजित पवार

घरकुलांसाठीच्या अनुदानात एक लाख रुपायांची वाढ करू : अजित पवार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : जिल्ह्यातील बेघर आणि भूमिहीनांना महाआवास योजनेतून केवळ घरकुल मंजूर करणे फायद्याचे नाही. ते घरकूल किमान एका पिढीसाठी तरी टिकेल, अशा पद्धतीने त्याचे बांधकाम केले पाहिजे. या घरकुलांच्या बांधकामाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रसंगी प्रती घरकुलांसाठीच्या अनुदानात वाढ करून ते अडीच लाख रुपयांपर्यंत केले जाईल. अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.३) पुण्यात बोलताना केली.

सध्या घरकुलासाठी प्रत्येकी दीड लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. मात्र या अनुदानात चांगल्या दर्जाचे बांधकाम करता येत नाही. यासाठी आदिवासी विभाग आणि सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्यांशी चर्चा करून या अनुदानात आणखी एक लाख रुपयांची वाढ केली जाईल. याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

हेही वाचा: यंदा जिल्ह्यातील 1800 होमगार्ड गणेशोत्सवावर बहिष्कार टाकणार?

महाआवास अभियानांतर्गत (ग्रामीण) घरकुल बांधकामात उत्कृष्ट काम करणारे तालुके, ग्रामपंचायत, क्लस्टर, बहुमजली इमारत बांधकामात विजेत्या ठरलेल्यांचा गौरव आज पवार यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, बांधकाम सभापती प्रमोद काकडे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील पुरस्कार विजेते

- पंतप्रधान आवास योजना विजेते तालुके - भोर (प्रथम), खेड (द्वितीय), जुन्नर (तृतीय)

- राज्य पुरस्कृत आवास योजना विजेते तालुके - खेड (प्रथम), वेल्हे (द्वितीय) मावळ (तृतीय)

- पंतप्रधान आवास योजनेंतर्गत उत्कृष्ट ग्रामपंचायती - टाकवे बुद्रूक (प्रथम), भोलावडे (द्वितीय), मदनवाडी (तृतीय)

- राज्य पुरस्कृत योजना उत्कृष्ट ग्रामपंचायती - अंबवडे (प्रथम), वाशेरे (द्वितीय), कोंडवळ (तृतीय)

- सर्वोत्कृष्ट वित्तीय संस्थेचा पुरस्कार - बँक ऑफ महाराष्ट्र

- सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार : रेलफोर फाउंडेशन

- अन्य पुरस्कार विजेते - पी. एन. मिसाळ, आर. एस. पाटील, एन. एन. फुलारी, अशोक शेवाळे, पी. के. पाटील.

loading image
go to top