Ajit Pawar News : बारामतीच्या मेळाव्यात अजित पवार मोठा धमाका करणार? राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचं सूचक विधान

Ajit Pawar News : रविवारी (ता. 14) दुपारी एक मिशन हायस्कूल ग्राऊंड टीसी कॉलेज समोर येथे हा मेळावा होणार आहे.
Ajit Pawar
Ajit Pawar Sakal
Updated on

बारामती : येत्या रविवारी (ता. 14) बारामतीत होणा-या राष्ट्रवादीच्या जन सन्मान मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार मोठा धमाका करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी बारामतीत दिली.

येत्या रविवारी होणा-या मेळाव्याच्या निमित्ताने गारटकर यांनी पुणे व बारामतीत जिल्ह्यातील पक्षातील सर्वच प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. या प्रसंगी पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष जय पाटील, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, महिला तालुकाध्यक्षा ज्योती लडकत, शहराध्यक्षा अनिता गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

रविवारी (ता. 14) दुपारी एक मिशन हायस्कूल ग्राऊंड टीसी कॉलेज समोर येथे हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी राज्य मंत्रीमंडळातील राष्ट्रवादीचे सर्व मंत्री, सर्व आमदार, खासदार, पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Ajit Pawar
Worli Hit and Run Case: वरळी हिट अँड रन प्रकरणी मुख्य आरोपी मिहीर शहाच्या अडचणीत वाढ; कोर्टाने दिली १६ जुलै पर्यंत पोलिस कोठडी

लोकसभेच्या निवडणूकीनंतर आगामी विधानसभा निवडणूकीत कोणताच धोका पत्करायचा नाही, सरकारने घेतलेले सर्व लोकोपयोगी निर्णय मतदारांपर्यंत पोहोचविण्यात कोठेही कमी पडायचे नाही, सोशल मिडीयाचा प्रभावी वापर करायचा असा अजेंडा ठरवूनच आता राष्ट्रवादीची व्यूहरचना ठरली आहे.

बारामतीप्रमाणेच राज्यातील प्रमुख शहरात अशा पध्दतीने मेळाव्यांचे आयोजन केले जाणार आहे. सर्व प्रमुख नेते, आमदार व पदाधिकारी यांची एकीही या निमित्ताने महाराष्ट्रासमोर येईल असा पक्षाचा प्रयत्न आहे.

Ajit Pawar
ED Summons Elvish Yadav : युट्यूबर एल्विश यादव पुन्हा अडचणीत; ईडीने चौकशीसाठी बजावले समन्स

अजित पवार काय धमाका करणार?

बारामतीच्या रविवारच्या मेळाव्यात अजित पवार काहीतरी मोठा धमाका करण्याच्या तयारीत असल्याचे प्रदीप गारटकर यांनीच स्पष्ट केले. त्यांनी या बाबत फार काही सविस्तर सांगितले नसले तरी मोठा लोकोपयोगी निर्णय अजित पवार बारामतीत जाहीर करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.