बारामती/माळेगाव : तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नीलकंठेश्वर पॅनेलने २१ पैकी २० जागांवर विजय मिळवीत सत्ता स्थापन केली आहे. .या निवडणुकीसाठी नीलकंठेश्वर पॅनेलसोबतच, चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांच्या नेतृत्वाखालील सहकार बचाव पॅनेल, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विचारांच्या उमेदवाराचे बळिराजा पॅनेल व दशरथ राऊत यांच्या नेतृत्वाखालील कष्टकरी शेतकरी विचारांचे पॅनेल अशी चौरंगी लढत झाली.उमेदवारी अर्ज माघारीनंतर अवघा एक आठवड्याचाच कालावधी प्रचारासाठी मिळाल्याने सर्वांचीच निवडणुकीत धावपळ झाली. अजित पवार यांनी सर्वोत्तम भाव देण्यासह राज्यातील.पहिल्या पाच कारखान्यांच्या यादीत हा कारखाना नेऊन ठेवण्याची ग्वाही दिली होती. चंद्रराव तावरे यांनी अजित पवार यांना लक्ष्य करत सहकार मोडीत काढायचा घाट त्यांनी घातल्याचा आरोप करत त्यांच्या खासगी कारखान्यांच्या मुद्यासह धनशक्तीचा वापर केल्याचा मुद्दा मांडला होता. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मार्गदर्शन घेत कारखान्याचा चौफेर विकास करण्याची ग्वाही बळिराजा पॅनेलच्या वतीने दिली होती.या निवडणुकीत नीलकंठेश्वर पॅनेलसाठी अजित पवार, क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे यांनी, बळिराजा पॅनेलसाठी खासदार सुप्रिया सुळे व युगेंद्र पवार यांनी तर सहकार बचाव पॅनेलसाठी चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांनी कार्यक्षेत्रात सभांचा धडाका लावला होता. जिल्हा बँक रात्री अकरापर्यंत सुरु असण्यासह, मतमोजणीची जागा बदलणे व निवडणुकीत पैशांचा वापर केल्याचा आरोप विरोधकांकडून अजित पवार यांच्यावर केला गेला. सभासदांनी मात्र आपला कौल नीलकंठेश्वर पॅनेलच्या पारड्यात टाकला..दरम्यान, बारामती येथील प्रशासकीय भवन येथे मंगळवारी (ता. २४) सकाळी आठ वाजता सुरु झालेली मतमोजणी ३६ तासांनी बुधवारी (ता. २५) रात्री आठ वाजता संपली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत स्वतः अजित पवार ‘ब’ वर्गातून ९१ विरुद्ध १०, अशा मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. महिला राखीव गटात अजित पवार गटाच्या संगीता कोकरे व ज्योती मुलमुले या विजयी झाल्या. येथे चंद्रराव तावरे गटाच्या राजश्री कोकरे यांनी चांगली लढत दिली. त्यांचा अवघ्या ९१ मतांनी पराभव झाला. विरोधी चंद्रराव तावरे गटाचे प्रमुख नेते रंजनकुमार तावरे यांनाही पराभव स्वीकारावा लागला..मतदारसंघनिहाय निकाल पुढीलप्रमाणे• ब वर्ग संस्था प्रतिनिधीअजित पवार- नीलकंठेश्वर पॅनेल- ९१- (विजयी)भालचंद्र देवकाते- सहकार बचाव पॅनेल- १०- (पराभूत)भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास मतदारसंघविलास ऋषीकांत देवकाते- नीलकंठेश्वर पॅनेल- ८९७२ (विजयी)सूर्याजी देवकाते- सहकार बचाव पॅनेल- ६५९८ (पराभूत)• इतर मागासप्रवर्गनितीन वामनराव शेंडे- नीलकंठेश्वर पॅनेल- ८४९४ (विजयी)रामचंद्र नाळे- सहकार बचाव पॅनेल- ७३४१ (पराभूत)• अनुसूचित जाती जमाती प्रवर्गरतनकुमार भोसले- नीलकंठेश्वर पॅनेल- ८६७० (विजयी)बापूराव गायकवाड- सहकार बचाव पॅनेल- ७१८३ (पराभूत)• महिला राखीव प्रवर्गसंगीता कोकरे- नीलकंठेश्वर पॅनेल- ८४४० (विजयी)ज्योती मुलमुले- नीलकंठेश्वर पॅनेल- ७५७६ (विजयी)राजश्री कोकरे- सहकार बचाव पॅनेल- ७४८५ (पराभूत)सुमन गावडे- सहकार बचाव पॅनेल- ६०९९ (पराभूत)माळेगाव गटरणजित जाधवराव - नीलकंठेश्वर पॅनेल- ८६१२ (विजयी)राजेंद्र बुरुंगले- नीलकंठेश्वर पॅनेल- ८११६ (विजयी)बाळासाहेब तावरे- नीलकंठेश्वर पॅनेल- ७९४६ (विजयी)रंजनकुमार तावरे- सहकार बचाव पॅनेल- ७३५३ (पराभूत)संग्राम काटे- सहकार बचाव पॅनेल- ६७०१ (पराभूत)रमेश गोफणे- सहकार बचाव पॅनेल- ६३०२ (पराभूत)• पणदरे गट-योगेश जगताप- नीलकंठेश्वर पॅनेल- ८६३५ (विजयी)स्वप्नील जगताप- नीलकंठेश्वर पॅनेल- ७९३३ (विजयी)तानाजी कोकरे- नीलकंठेश्वर पॅनेल- ८४९५ (विजयी)सत्यजित जगताप- सहकार बचाव पॅनेल- ६२३२ (पराभूत)रणजित जगताप- सहकार बचाव पॅनेल- ६१३४ (पराभूत)रोहन कोकरे - सहकार बचाव पॅनेल- ७०८३ (पराभूत)(मताधिक्य- २४०३)• सांगवी गटगणपत खलाटे- नीलकंठेश्वर पॅनेल- ८५४३ (विजयी)विजय तावरे- नीलकंठेश्वर पॅनेल- ७८८२ (विजयी)वीरेंद्र तावरे- नीलकंठेश्वर पॅनेल- ७२८९ (पराभूत)चंद्रराव तावरे - सहकार बचाव पॅनेल- ८१६३ (विजयी)रणजित खलाटे- सहकार बचाव पॅनेल- ७२२४ (पराभूत)संजय खलाटे - सहकार बचाव पॅनेल- ६१५४ (पराभूत)• बारामती गटनितीन सातव - नीलकंठेश्वर पॅनेल- ७८५८- (विजयी)देविदास गावडे- नीलकंठेश्वर पॅनेल- ८०२८- (विजयी)गुलाबराव गावडे- सहकार बचाव पॅनेल- ७०८० (पराभूत)वीरसिंह गवारे- सहकार बचाव पॅनेल- ७०२१ (पराभूत)• नीरा वागज गटअविनाश देवकाते- नीलकंठेश्वर पॅनेल- ८६४० (विजयी)जयपाल देवकाते- नीलकंठेश्वर पॅनेल- ८०५१- (विजयी)राजेश देवकाते- सहकार बचाव पॅनेल- ६४९९ (पराभूत)केशव देवकाते- सहकार बचाव पॅनेल- ६४३६ (पराभूत)• खांडज शिरवली गटप्रताप आटोळे- नीलकंठेश्वर पॅनेल- ८३२८- (विजयी)सतीश फाळके- नीलकंठेश्वर पॅनेल- ८४०४- (विजयी)विलास सस्ते- सहकार बचाव पॅनेल- ६४३६ (पराभूत)मेघश्याम पोंदकुले- स. बचाव पॅनेल- ६४२२ (पराभूत).प्रमुख पराभूत उमेदवारप्रमुख पराभूतांमध्ये माजी अध्यक्ष रंजन तावरे, ॲड. जी. बी. गावडे, माजी उपाध्यक्ष रमेश गोफणे, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष ॲड. राजेंद्र काटे देशमुख, विद्यमान संचालक सुरेश खलाटे, माजी संचालक तानाजी पोंदकुले, राजेश देवकाते, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भगतसिंग जगताप यांचा समावेश आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.