Ajit Pawar : ‘तिजोरी सर्वांसाठी खुली’; माळेगावच्या सभेत अजित पवारांचा निधी-वाटपातील भेदभावावर मोठा खुलासा!

Malegaon Election : माळेगावच्या सभेत अजित पवार यांनी तिजोरीविषयीचे गैरसमज दूर करत राज्यातील निधी वाटपात कोणताही भेदभाव होणार नसल्याचे स्पष्ट केले. बंडखोरांना इशारा देत निवडणूक एकजुटीने लढवण्याचा संदेश त्यांनी दिला.
Ajit Pawar Clarifies Treasury Controversy in Malegaon

Ajit Pawar Clarifies Treasury Controversy in Malegaon

Sakal

Updated on

माळेगाव : महाराष्ट्र सरकारमध्ये मी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस पाच वर्ष लोकाभिमुख कामे करण्यासाठी एकत्र राहणार आहे. राज्याच्या तिजोरीतून निधी देताना कोणताही भेदभाव केला जाणार नाही. परंतु मध्यंतरी तिजोरी माझ्याकडे असल्याचे बोललो, की प्रसार माध्यमांनी त्या वक्तव्याचा अर्थ चुकीचा काढला. त्या वक्तव्यांवर तिजोरीचा मालक देवाभाव आहे, असे बोलून अनेकांनी आपापली मते मांडत वातावरण तापविले. परंतु आम्ही एकमेकांच्या विचारानेच तुमच्या पाठिंब्यावर राज्य पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतो, असा खुलासा करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगावच्या सभेत तिजोरीच्या वादावर पडदा टाकला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com