

Ajit Pawar Promises Baramati-Like Transformation for Manchar
Sakal
मंचर : “१९९० पासून दिलीप वळसे पाटील व मी विधी मंडळात एकत्र काम करत आहोत. हुतात्मा बाबू गेनू सागरातून (डिंभे धरण) उताराणे १३६ कोटी रुपयांची नळयोजना राबवली जाईल.भरमसाठ येणाऱ्या वीज बिलाचा खर्च वाचेल. मंचरला २४ तास पिण्याचे पाणी मिळेल. चार एकरांमध्ये सोलर प्रकल्प, पोलीस चौकी, कचरा व सांडपाणी व्यवस्थापन, गरीब कुटुंबांना घरकुल, समाजाभिमुख आणि पारदर्शक प्रशासन ,सर्व कामे तातडीने हाती घेतली जातील.बारामतीप्रमाणे मंचर शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निधी कमी पडू देणार नाही त्यासाठी येथे राष्ट्रवादीकॉंग्रेस व भाजप युतीतील उमेदवारांना विजयी करा”. असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.