राष्ट्रवादीचं ठरलं ! अजित पवारांना 'या' गोष्टीचे सर्वाधिकार

गजेंद्र बडे
Wednesday, 27 November 2019

  • झेडपीचा नवा अध्यक्ष अजितदादाचं करणार फायनल

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या नव्या अध्यक्षांचे नाव माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हेच फायनल करणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष हा पुन्हा एकदा अजितदादा म्हणतील, तोच असणार आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना ही पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या सरकारी बंगल्यात झालेली आहे. या पक्षाच्या स्थापनेपासून आजतागायत पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व आहे. त्यामुळे येथील अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समित्यांच्या सभापतींची नावे ही अजितदादाच फायनल करत असतात.

रोहित पवार आणि आदित्य ठाकरेंना मिळणार 'ही' मंत्रीपदं?

मात्र गेल्या शनिवारी (ता.२३) भाजपसोबत गेले आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथही घेतली. शिवाय जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवडणूक अगदी तीन आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे यंदा अजित पवार यांच्या अनुपस्थितीत पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांची नावे निश्चित होणार, अशी चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात रंगली होती. यामुळे  या पदांसाठी इच्छूक असलेल्या अजित पवार समर्थकांचा मूडही गेला होता.

पवारसाहेब आयसीसीचे अध्यक्ष होते हे गडकरी विसरले

पण, कालपासून (ता.२६) पवार पुन्हा राष्ट्रवादीत सक्रिय झाले आहेत. यामुळे दादाच नवा अध्यक्ष ठरवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे दादा समर्थकांमध्ये ऊत्साह निर्माण झाला आहे.

आनंदाच्या क्षणी भाऊ नाही विसरला भावाला !

दरम्यान, भाजपचे अल्पमतातील सरकार कोसळल्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार येणार हे निश्चि झाले असून उद्धव ठाकरे हे आता महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील हे निश्चित आहे. यात अजित पवार हे उपमुख्यमंत्री असतील. अजित पवार यांनी आज होणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या बैठकीलाही उपस्थिती लावली आहे. उद्या सायंकाळी शिवतीर्थावर हा शपथविधी होणार आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar may Final the name of Pune ZP president