'पवारसाहेब आयसीसीचे अध्यक्ष होते, हे गडकरी विसरले'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

आमदार फोडण्यासाठी भाजपने 'ऑपरेशन लोटस' मोहिम सुरू केली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वापुढे भाजपचा टिकाव लागला नाही. 

पुणे : महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचे मिळून नवीन सरकार सत्तेवर आले आहे. आज सर्व आमदारांचा शपथविधी पार पडला. उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आपली प्रतिक्रिया नोंदविली आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

मलिक यांनी ट्विटरवर ट्विट करताना भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना टोला लावला. ते म्हणाले, ''शरद पवार हे बीसीसीआय आणि आयसीसी या क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष राहिले आहेत. हे नितीन गडकरी विसरले होते का? केले ना पवार साहेबांनी क्लीन बोल्ड?'' 

- 'काही गोष्टी झाल्या नसत्या, तर बरं झालं असतं' - धनंजय मुंडे

महाराष्ट्रात राजकीय घडामोडी घडत असताना भाजप पिछाडीवर जात असल्याचे पाहून नितीन गडकरी यांनी 'राजकारण आणि क्रिकेटमध्ये कधीही काहीही होऊ शकते,' अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर शनिवारी (ता.23) सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.

- 'तानाजी'च्या निमित्ताने 'सिंहगड' चर्चेत 

त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आले आणि रणनीती आखणीस सुरवात झाली. त्यांचे आमदार फोडण्यासाठी भाजपने 'ऑपरेशन लोटस' मोहिम सुरू केली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वापुढे भाजपचा टिकाव लागला नाही. 

- भाजपला आणखी एका पक्षाचा रामराम; महाविकासआघाडीची संख्या झाली...

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने भाजपला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. आणि दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाचा राजीनामा देत भाजपला बॅकफूटवर टाकले. पुरेशा संख्याबळाअभावी भाजपने सत्तेतून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP MLA Nawab Malik criticized BJP Minister Nitin Gadkari