Ajit Pawar
esakal
Summary
1️⃣ अजित पवार यांनी स्पष्ट केले की घायवळ प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होणार नाही.
2️⃣ सचिन घायवळला पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शस्त्र परवाना दिला नाही असे त्यांनी सांगितले.
3️⃣ शस्त्र परवाना देण्यासाठी कोणाचा दबाव होता याची चौकशी होणार आहे.
पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ आणि त्याचा भाऊ सचिन घायवळ प्रकरणावरुन आरोप-प्रत्यारोप होत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घायवळच्या शस्त्र परवानासंबंधी महत्वाची माहिती दिली आहे. निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शस्त्र परवाना होता असे अजित पवार यांनी सांगितले. ते यात सहभागी असतील त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई व्हायला हवी. या प्रकरणात कुठलाही राजकीय हस्तक्षेप होणार नाही असे अजित पवार म्हणाले.