Ajit Pawar : पहिले उद्धव ठाकरे अन् मग एकनाथराव; अजित पवारांचं हटके उत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

Ajit Pawar : पहिले उद्धव ठाकरे अन् मग एकनाथराव; अजित पवारांचं हटके उत्तर

Ajit Pawar On Dasara Melava Speech : अजित पवार हे नेहमीच त्याच्या विविध प्रतिक्रिया आणि स्पष्टवक्तपणामुळे चर्चेत असतात. यावेळीदेखील त्यांनी एक उत्तर दिले आहे. त्यांच्या या विधानानंतर अजित पवारांचे एकनाथ शिंदेंपेक्षा उद्धव ठाकरेंवर अधिक प्रेम असल्याची चर्चा रंगली आहे. ते पुण्यात बोलत होते.

हेही वाचा: Viral Video : क्रिएटिव्हिटीचा कहर! बटर चिकन आईस्क्रीम विथ ग्रीन चटणी

त्याचे झाले असे की, येत्या 5 ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे दसरा मेळाव्याचे भाषण होणार आहे. यापार्श्वभूमीवर अजित पवारांना दसरा मेळाव्याला एकाच वेळी मुख्यमंत्री शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं भाषण सुरु झालं तर कोणाचं भाषण तुम्ही ऐकणार? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवारांनी हटके स्टाईल उत्तर देत दसरा मेळाव्याला कोणाचंही भाषण ऐकलं आणि एकाच वेळी दोन्ही भाषणं सुरु झाली तर, उद्धव ठाकरेंचं भाषण पहिल्यांदा ऐकू आणि मग एकनाथरावांचं असं उत्तर अजित पवारांनी दिले आहे. एवढं बोलून थांंबणार ते अजित पवार कसले.

हेही वाचा: Digvijay Singh : गेहलोतांपाठोपाठ दिग्विजय सिंह यांचीदेखील माघार

तसंही तुम्ही चॅनलवाले तुम्ही रिपीट करतच असता. हे तुमचं कामच आहे. त्यामुळे दुसरं चॅनेल लावायचं आणि दुसरं भाषण ऐकायचं. त्यात काय? अर्धा तास पुढं मागे झालं तरी बिघडलं कुठं?” असे हसतच उत्तर अजित पवारांनी दिले. त्यांच्या या विधानानं एकच हशा पिकला. दसरा मेळावा कोणाचा मोठा होणार याबाबत आता दोघांमध्ये एक ईर्षा निर्माण झाली आहे. मेळावा मोठा करण्याचा अधिकार प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आहे. दोन्हीही गट इतरांना त्रास होणार नाही आणि नियमांचं पालन करून मेळावा करतील अशी अपेक्षा असल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा: EMI महागणार : RBI कडून रेपो दरात 50 बेसिस पॉईंट्सची वाढ

कोणाला खुश करायच आणि कोणाला नाराज ठेवायच हा त्यांचा अधिकार असून, त्यामध्ये आम्ही नाक खुपसण्याच काम नाही.तसेच काही महिने शिंदे आणि फडणवीस हे दोघेच सर्व काम पहात होते. आता कुठे 20 जण झाले आणि पालकमंत्री नेमले आहेत. त्यामुळे त्यांना ज्यावेळी योग्य वाटेल तेव्हा मंत्रिमंडळ विस्तार करतील असे म्हणत अजित पवारांनी टोला लगावला. सध्या राज्यात जे काही सुरू आहे हे सर्व जनता पाहत असल्याच ते म्हणाले.