
पिंपरी : ‘‘वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी हिंजवडीसह चाकण परिसरातील अतिक्रमणे हटवा. त्यानंतर तातडीने रस्त्यांचा विकास गरजेचा आहे. त्याबाबत यंत्रणांनी समन्वय ठेवावा. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अपेक्षित प्रमाणात रस्त्यांचे रुंदीकरण करण्याच्या दृष्टीने तातडीने पावले उचलावीत,’’ असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.