
हाच महाविकास आघाडीचा संकल्प आहे, असे अजित पवारांनी यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार चांगले काम करत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
पुणे : कोरेगाव भीमा येथील जय स्तंभाला अभिवादन केल्यानंतर राज्याचे उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचा नव्या वर्षातील संकल्पही बोलून दाखवला. कोरोनामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या. नऊ महिने वाया गेले. छोटे-मोठे उद्योजक असतील विकास कामाच्या बाबतीतील निर्णय असतील यावर योग्य तो निर्णय घेऊन राज्याचा आर्थिक गाडा पूर्वपदावर आणायचा आहे.
केंद्र सरकारकडून येणारा निधी अद्याप राज्याला मिळालेला नाही. परंतु ऐकमेकांवर ढकलण्याऐवजी अर्थव्यवस्थेला गती देण्यावर भर देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असेल, राज्यातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करु, हाच महाविकास आघाडीचा संकल्प आहे, असे अजित पवारांनी यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार चांगले काम करत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
Exclusive:दोन्ही ‘दादां’समोर उभं राजकीय कसोटीचं वर्ष
दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे कोरेगाव भीमा येथे कार्यक्रम पार पडलाय ऐतिहासिक लढाईत जे शूरवीर शहीद झाले त्यांना अभिवादन करण्यासाठी याठिकाणी आलो, असे अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. मधल्या काळामध्ये शौऱ्य गाथा सांगणाऱ्या या कार्यक्रमाला गालबोट लागल्याा उल्लेखही त्यांनी केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने गर्दी टाळण्याचे आव्हान केले होते, त्याला नागरिकांनीही प्रतिसाद दिल्याचेही अजित पवारांनी सांगितले.
कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक स्तंभाला अभिवादन करण्याचा कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारने कार्यक्रमाचे सह्याद्री वाहिनीवरुन थेट प्रसारण करण्याचा निर्णय घेतला होता. गर्दी टाळून नागरिकांनी घरातूनच अभिवादन करावे, असे अहवान करण्यात आले होते. नागरिकांनी याला प्रतिसादही दिला. राज्याचे उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरेगाव भीमा येथे जाऊन परंपरेनुसार जयस्तंभाला अभिवादन केले. यावेळी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह अन्य कार्यकर्तेही उपस्थितीत होते.