ajit pawar funeral woman crowd
sakal
बारामती - ‘दादांना शेवटचे भेटू’ असे म्हणणारी मायमाउली हुंदके देत तिरंगी ध्वजात लपेटलेला दादांचा देह लेकराला दाखवत होती. घशाला कोरड पडलेली असूनही लाखांच्या गर्दीत ‘एकच वादा, अजित दादा’ घोषणा देणारा तिशीतला तरुण धाय मोकलून रडत होता. मैदानाच्या कोपऱ्यात ८६ वर्षांच्या आजोबांची ‘दादा तुम्ही परत या’ची आर्त हाक काळजाचा ठाव घेत होती.