Ajit Pawar Aircraft Crash In Baramati Shocks Maharashtra
Esakal
पुणे
Baramati Plane Crash : अजित पवारांच्या विमानाचा अपघात, ६ जणांचा मृत्यू; DGCAने दिले अपडेट्स
Ajit Pawar's Plane Crash : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा पुण्यात अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. लँडिंगवेळी हा अपघात झाला असून घटनास्थळी भीषण अशी परिस्थिती होती. विमानातून उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांचे ओएसडी आणि इतर काही जण होते असं समोर येतंय. विमानाने लँडिंगवेळी क्रॅश होताच पेट घेतला. यामुळे विमानाचा पुढचा भाग जळून खाक झाला आहे. दरम्यान विमान अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती डीजीसीएकडून देण्यात आली आहे. तर अजित पवार यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येतंय.

