

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे पुत्र जय पवार यांनी VSR कंपनीच्या मालक रोहित सिंह यांचा एक धक्कादायक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यात रोहित सिंह उड्डाणादरम्यान मुख्य पायलटच्या सीटवर झोपलेले दिसत आहेत. या निष्काळजीपणामुळे सिंह यांना अटक करा अशी मागणी जय पवार यांनी केली आहे. माझ्या वडिलांना आपण गमावलंच, आता एका मुलाची आर्त हाक आहे, असं सांगत त्यांनी डीजीसीएकडे कारवाईची मागणी केली आहे.