esakal | अजित पवार राज्यात मोठा भूकंप करण्याच्या तयारीत? शरद पवारांनी सोपवली मोठी जबाबदारी
sakal

बोलून बातमी शोधा

ajit-d.jpg

पक्षाचे युवा नेते पार्थ पवार यांना फटकारल्यामुळे राज्यात राजकीय चर्चा सुरू असतानाच आता राष्ट्रवादी राज्यात एक मोठा राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना परत आणण्यासाठी राष्ट्रवादीकडून राजकीय व्यूहरचना आखली जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.

अजित पवार राज्यात मोठा भूकंप करण्याच्या तयारीत? शरद पवारांनी सोपवली मोठी जबाबदारी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : सध्या राज्यात ज्येष्ठ नेते ऱाष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू युवा नेते पार्थ पवार यांना फटकारल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. सर्व प्रसारमाध्यमे व सोशल मिडियामध्ये याबाबत चर्चा सुरु आहे. यामध्येच बुधवारी शरद पवार यांच्या  सिल्वर ओक या निवासस्थानी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यामध्ये एक बैठक झाली. यामध्ये राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांना परत पक्षप्रवेश देण्याबाबत चर्चा झाल्याचे वृत्त आहे. भाजपमधील एक मोठा गट सध्या फुटण्याचा मार्गावर असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. या नेत्यांचा प्रवेश केव्हा घडवून आणायचा याची मोठी जबाबदारी शरद पावर यांनी अजित पवार यांच्यावर सोपविल्याची माहिती पुढे येत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पक्षाचे युवा नेते पार्थ पवार यांना फटकारल्यामुळे राज्यात राजकीय चर्चा सुरू असतानाच आता राष्ट्रवादी राज्यात एक मोठा राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना परत आणण्यासाठी राष्ट्रवादीकडून राजकीय व्यूहरचना आखली जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.

शरद पवार, जयंत पाटील आणि अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यात बुधवारी एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांना परत पक्षप्रवेश केव्हा व कसा द्यायचा याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. महाविकास आघाडीत असणार्या तिनही पक्षाचं राजकारण, पक्षाची ताकद पाहून या सर्व नेत्यांना पुन्हा प्रवेश दिला जाणार असल्याचं समजतं आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राष्ट्रवादीतील गयारामांना पुन्हा पक्षात प्रवेश देण्याची जबाबदारी शरद पवारांकडून अजित पवार, जयंत पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे. लवकरच राष्ट्रवादीत काही भाजप आमदारांच्या प्रवेश करून घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आमदारांना पुन्हा पक्षात घेताना राष्ट्रवादीकडून शिवसेना आणि काँग्रेसला विश्वासात घेतलं जाईल, असंही बोललं जात आहे.

देशाचा जलखजिना आता एकाच क्लिक वर

एकीकडे भाजपचे नेते पार्थ पवार यांच्या निमित्ताने राष्ट्रवादीतील अंतर्गत वादावर टोला लगावत असतानाच राष्ट्रवादी ही व्यूहरचना आखत आहे. त्यामुळे आता भाजपला डॅमेज कण्ट्रोलसाठी प्रयत्न करावे लागणार की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले, ''आमच्या संपर्कात भाजपचे काही आमदार असतील तर आम्ही काही असं जाहीररित्या सांगणार तर नाही ना! जर भाजपचे कोणी आमदार आमच्याकडे आले तर त्यांना राजीनामा देऊन त्यांना यावं लागेल, ते आमच्याकडे आले तर ते निवडून येऊ शकतात.'' 

(Edited by : Sagar Diliprao Shelar)