देशाचा जलखजिना आता एकाच क्‍लिकवर  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gk.jpg

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने देशभरातील पाण्याविषयी माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी "इंडीया वॉटर रिसोर्स इन्फरमेशन सिस्टिम' (India-WRIS) ही प्रणाली विकसित केली आहे.

देशाचा जलखजिना आता एकाच क्‍लिकवर 

पुणे : केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने देशभरातील पाण्याविषयी माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी "इंडीया वॉटर रिसोर्स इन्फरमेशन सिस्टिम' (India-WRIS) ही प्रणाली विकसित केली आहे. विशेष म्हणजे या संकेतस्थळावरील माहिती "जीआयएस प्लाटफार्म'वर उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे धरणाचे पाणलोट क्षेत्र, लाभक्षेत्र, कालवे, जलविद्युत प्रकल्प इत्यादी माहिती आपल्याला "जीओ-स्पेशल' स्वरूपात पाहता येणार आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केंद्र सरकारने ही सर्व माहिती https://indiawris.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. 2008 पासून या संकेतस्थळाचे काम सुरू होते. नुकतेच या प्रणालीचे अद्ययावतीकरण करण्यात आले असून यामध्ये नवीन मोडयूल्स आणि कार्यप्रणालीचा समावेश करण्यात आला आहे. सध्या ही माहिती केवळ इंग्रजी भाषेतच उपलब्ध करून देण्यात आली असून ती मोफत पाहण्यासाठी उपलब्ध आहे. 

बारामतीकरांनो सावधान, आता कोरोनाच्या समूह संसर्गाचा धोका 

संकेतस्थळावर काय माहिती

जलसिंचन प्रकल्प : देशातील जलसिंचन प्रकल्पांची ठळक वैशिष्टे, लघु पाटबंधारे प्रकल्पांची माहिती, नदीजोड प्रकल्पांतर्गत प्रस्तावित असलेल्या लिंक, तसेच जलवाहतूक करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या लिंक्‍स जीआयएस नकाशावर पहाता येणार आहे. पाण्याच्या अतिवापरामुळे पाणथळ, तसेच क्षारपड झालेल्या जमीनीची माहिती. धरणात साठलेल्या गाळाची माहिती. 

भूजल : देशातील भूजल पातळी, त्यांची गुणवत्ता आणि जललेखा याबाबतची माहिती. 
जलसंपदा : या अंतर्गत देशातील नदी खोरे, उपखोरे, जलाशय, पाणथळ जमीनी, बर्फाचे तलाव, समुद किनारपट्टीबाबत माहिती आणि जल पर्यटन ही माहीती. 
जमीन : या अंतर्गत देशातील जमीनीचा प्रकार, त्याचा वापर , वापरायोग्य नसलेली जमीन, सामाजिक-आर्थिक माहिती, जमीनीचा ऱ्हास, मातीचे प्रकार आणि कृषी- अर्थव्यवस्था आणि कृषी - हवामान याचे विभागाबाबतची माहिती. 
पाण्याशी निगडीत महत्वाच्या घटना : उदा : पूर, दुष्काळ, पावसासंबंधीची माहिती. 

रियल टाईम माहिती : या संकेतस्थळाचे हे एक महत्वाचे वैशिष्ट म्हणजे जलविषयक रियल टाईम माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये देशातील धरणांवर दैनंदिन पाणीसाठा , धरणातून सोडणारा विसर्ग, तसेच धरणक्षेत्रात पडणारा पाऊस आणि हवामानाचे इतर घटक. 
प्रकाशने : नदी खोरे अहवाल, देशातील सर्व नद्यांचे नकाशे ,पाणलोट क्षेत्र नकाशे यासह इतर महत्वाचे अहवाल. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोणाला याचा उपयोग होणार- 
या संकेतस्थळावरील माहितीचा उपयोग सर्वसामान्य जनतेला या विषयाची ओळख होण्यासाठी होणार आहे. तसेच पाण्याविषयी विविधांगी माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असल्याने या विषयात संशोधन करणाऱ्यांना यांचा लाभ होणार आहे. 

हवामान आणि जलसाठ्यांसंबंधी सर्वसामवेशक माहिती एकाच संकेतस्थळावर यामुळे उपलब्ध होणार आहे. एक प्रकारे माहितीचा खजिनाच "इन्ट्रॅक्‍टिव्ह' पद्धतीने संशोधकांसह सामान्य माणसांपुढे खुला होणार आहे. रियल टाईम डेटा अधिक उपलब्ध होत गेल्यास संशोधन आणि प्रशासकीय निर्णयासाठी याचा भरपूर उपयोग होईल -चारूता मुरकुटे (संशोधक विद्यार्थी, आयआयटीएम) 

(Edited by : Sagar Diliprao Shelar)