esakal | यंदाही पायी वारी आणि विठ्ठल दर्शन नाहीच - अजित पवार
sakal

बोलून बातमी शोधा

Wari

आषाढी वारीबाबत पुण्यातील बैठकीत चर्चा झाली. देहु आणि आळंदीत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी 100 लोकांना परवानगी देण्यात आली आहे.

यंदाही पायी वारी आणि विठ्ठल दर्शन नाहीच - अजित पवार

sakal_logo
By
सूरज यादव

पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा पालकमंत्री अजित पवार यांनी आज घेतला. त्यानंतर बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. आषाढी वारीबाबत पुण्यातील बैठकीत चर्चा झाली. देहु आणि आळंदीत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी 100 लोकांना परवानगी देण्यात आली आहे. तसंच 10 मानाच्या पालख्यांसाठी 50 जणांना सहभागी होता येणार आहे. त्यांना मान्यता देण्याचा प्रस्ताव दिला आहे. पालखीसोबत त्यांना चालत जाता येणार नाही. प्रत्येक पालखीला 2 बसेस असं दहा पालख्यांना 20 बसेस दिल्या जातील.

कसा असणार पायी वारी सोहळा

- पालखी यंदाही बस मधूनच पंढरपूरकडे जाणार

- लवकरच शासन त्याबद्दल सविस्तर आदेश काढणार आहे

- इतर वारकरी दर्शनासाठी येऊ शकणार नाहीत

- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तपासणी बंधनकारक

- काला आणि रिंगण सोहळ्याला परवानगी दिली

- रथोत्सवला ही परवानगी, त्यासाठी १५ वारकऱ्यांना परवानगी

- प्रत्येक पालखीसोबत 40 वारकऱ्यांना परवानगी

- प्रस्थान सोहळ्याला 100 वारकऱ्यांची उपस्थिती

दहा मानाच्या पालख्या क्रम

०१) संत निवृत्ती महाराज ( त्रंबकेश्वर )

०२) संत ज्ञानेश्वर महाराज ( आळंदी )

०३) संत सोपान काका महाराज ( सासवड )

०४) संत मुक्ताबाई ( मुक्ताईनगर )

०५) संत तुकाराम महाराज ( देहू )

०६) संत नामदेव महाराज ( पंढरपूर )

०७) संत एकनाथ महाराज ( पैठण )

०८) रुक्मिणी माता ( कौडानेपूर -अमरावती )

०९) संत निळोबाराय ( पिंपळनेर - पारनेर अहमदनगर )

१०) संत चांगटेश्वर महाराज ( सासवड )

मानाच्या पालखी सोहळ्याचं आगमन हे दशमीला पंढरपूरात होईल. वाखरीत विशेष वाहनाने पोहोचल्यानंतर तिथून पंढरपूरपर्यंत पायी वारी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पंढरपूरचे मंदिर दर्शन खुले करण्यात येणार नाही असं अजित पवार यांनी सांगितलं.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा