

Former Maharashtra minister and NCP leader Manikrao Kokate after receiving relief from the Supreme Court, which stayed his sentence and prevented MLA disqualification in the government quarters scam case.
esakal
Summary
अजित पवार यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याशी फोनवर चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपकडून राष्ट्रवादीचे नेते फोडले जात असल्याने अजित पवार नाराज असून भाजपविरोधी मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दोन्ही राष्ट्रवादींसह महाविकास आघाडीची पुण्यात एकत्रित लढत उभी राहण्याची शक्यता चर्चेत आहे.
राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीने चांगलीच बाजी मारली आहे. पुणे जिल्ह्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने चांगली कामगिरी केली आहे. आता सर्वच पक्षांना महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. दरम्यान पुणे महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेसला एकत्र येण्यासाठी प्रस्ताव देण्यात आल्याचे समजते. महाविकास आघाडीला सोबत घेण्यासाठी अजित पवारांकडून चाचपणी करण्यात आली आहे.