जरा विचार करा! धनंजय मुंडे प्रकरणी अजित पवारांचा प्रश्न, भाजपला अप्रत्यक्ष टोला

सागर आव्हाड
Friday, 22 January 2021

मुंडेविरोधीतील तक्रार रेणू शर्माने मागे घेतल्याने प्रकरणाला पुन्हा वेगळे वळण लागले आहे. यावरुन बोलताना अजित पवार म्हणाले, ''आम्ही धंनजय मुंडेना पाठीशी घालतोय असे आरोप झाले, आम्ही संपूर्ण तपास होऊ द्या, सत्य बाहेर येऊ द्या म्हणत होतो, पण धनंजय मुंडे आणि आमच्या पक्षाची बदनामी झाली

पुणे : धनंजय मुंडे विरोधातील तक्रार मागे घेतली असली तर त्यामुळे मुंडे यांची 5-6 दिवस बदनामी झाली. मुंडे कुटुंबियांना नाहक त्रास सहन करावा लागला.एखाद्याची बदनामी करणं चुकीचं आहे. विरोधकांनी राजकारणासाठी वातावरण तापवलं. ज्यामध्ये तथ्य असेल ते तपासून, नियम- कायदे बघून पोलिस निर्णय घेतील. यामध्ये कोणाचा दोष असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे पण, राजकीय सूड बुद्धीने काम करणे चुकीचं आहे,'' अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी आज पुण्यात पत्रकरांशी बोलताना दिली. तसेच  ''सीरममध्ये सकाळपासून तपासणी(फायर ऑडिट) सुरू आहे. आग नेमकी कशामुळे लागली ते शोधलं जाईल. काहीच लपवले जाणार नाही'' अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. 

मुंडेविरोधीतील तक्रार रेणू शर्माने मागे घेतल्याने प्रकरणाला पुन्हा वेगळे वळण लागले आहे. यावरुन बोलताना अजित पवार म्हणाले, ''आम्ही धंनजय मुंडेना पाठीशी घालतोय असे आरोप झाले, आम्ही संपूर्ण तपास होऊ द्या, सत्य बाहेर येऊ द्या म्हणत होतो, पण धनंजय मुंडे आणि आमच्या पक्षाची बदनामी झाली. एखादी राजकीय व्यक्ती म्हणून प्रचंड काम करावं लागतं, कष्ट घ्यावे लागतात, पण असं जेव्हा घडतं तेव्हा त्याला एक क्षणात पायउतार व्हावं लागतं, याचा सगळ्यांनी गांभीर्याने विचार करायला पाहिजे.

म्हाडाच्या ५६४७ सदनिकांची आज Online सोडत; कोणाचं गृहस्वप्न होणार साकार?

''ज्यांनी ज्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली, त्यांच्या विरुद्ध वक्तव्य केलं त्याला जबाबदार कोण ? बहुजन समाजतून पुढे आलेला एक सहकारी, तो बदनाम होतो, त्याचं कुटुंब डिस्टर्ब होतं त्याला वाली कोण? काही लोक चुका करत असतील पण त्याची किंमत सगळ्यांनीच मोजायची का ?'' असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

अजित पवारांनी पुण्यात सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेत लसीकरणाचा आढावा घेतला, मात्र लसीकरण कमी होत असल्याचं निदर्शनास आल्याचे सांगितले लसीकरण का कमी होतं काय कळत नाही, मात्र अनेक कर्मचारी लस घेण्यास धजावत नाहीयेत. लसीकरणाबाबत अडचणी आहेत. कोविन अॅपची समस्या आहे. कारण देशस्तरावर काम करणार ते अँप आहे, त्यामुळे लसीकरण वाढवण्याच्यासाठी सूचना दिल्या आहेत, जिल्ह्यात फारचं कमी लसीकरण झालं. ग्रामीण भागात हे प्रमाण जास्त आहे.  ग्रामीण भागात 60/65 टक्के लसीकरण झालं. मात्र शहरात 25/30 टक्केच लोकांनी लस घेतली. लोक ऐनवेळी निर्णय बदलतात. शहरापेक्षा ग्रामीण भागात लसीकरण कमी आहे, त्यामुळे लसीकरण वाढवावं लागणार आहे, शहरातील इतर हॉस्पिटल्सनी लसीकरणाची परवानगी मागितली आहे, ती देण्याच्या संदर्भात राज्य सरकार केंद्र सरकारकडे पाठपूरावा करेल.''

खासगी डॉक्टर्स ना पण लस द्यावी अशी मागणी होत असून त्याबाबत निर्णय घेऊ. लस घेतल्यानंतर फारसे दुष्परिणाम दिसले नाहीत,  लसी संदर्भात काही डॉक्टरांचं वेगळं मत आहे,'' अशी माहिती देत, ''आम्हाला जेव्हा परवानगी मिळेल तेव्हा आम्ही लस घेऊ'' असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

...तर आमचा पायगुण वाईट आहे म्हणू नका ; अजित पवार यांची टोलेबाजी

पुण्यातील 19 नगरसेवक अजित पवार यांच्या संपर्कात आहेत अशी चर्चा सुरु होती. याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, ''काही जण वारे बदलते तसे बदलतात, किंवा त्यांची काही विकास काम करून घ्यायची असतील पण बेरजेचे राजकारण करायचं असतं. इलेक्टिव्ह मेरिट बघायचा असतो.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar question on Dhananjay Munde case