राज्यपालांनी आता आमचा अंत पाहू नये : अजित पवार

Ajit Pawar Said Now Governor Should made final decision about vidhan parishad 12 seats
Ajit Pawar Said Now Governor Should made final decision about vidhan parishad 12 seats

पुणे  :  विधानपरिषदेतील 12 जागांचा निर्णय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अद्याप घेतलेला नाही. त्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोखठोक मत व्यक्त केले आहे. राज्यपालांनी आता आमचा अंत पाहू नये, अशा शब्दांत त्यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. त्याचबरोबर त्यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरुन केंद्र सरकारवरही टीका केली. ते म्हणाले की, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सरकारला मार्ग काढावे लागतात हे समजू शकतो. पण, रस्त्यावर खिळे ठोकणे योग्य नाही. जवळपास 3-4 महिने झाले शेतकरी एवढ्या थंडीत उपोषण करतायेत. आतापर्यंत सरकारने चर्चा करुन मार्ग काढायला हवा होता. लोकशाहीमध्ये चर्चा करायची असते. चर्चेतून मार्ग काढायचा असतो.

पुणे दौऱ्यावर आल्यानंतर अजित पवार हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राज्यपालांनी आता आमचा अंत बघू नये. लवकरात लवकर निर्णय घ्यावा. ते महत्त्वाच्या पदावर बसले आहेत. सगळ्या नियम-अटी पाळण्याचे काम महाविकास आघाडीने केलेले आहे. कॅबिनेटमध्ये ठराव केले आहेत. मुख्यमंत्र्याच्या पत्रांतून 12 जणांची विधानपरिषदेसाठी नावे दिली आहेत. सभागृहात 171 आमदारांचे बहुमत सिद्ध झालेले आहे. एवढे सगळे झाले असताना आज ज्यांच्या हातात शेवटची सही करायची आहे, ते सही करत नाहीत. त्यासाठी आम्हाला त्यांना भेटावे लागेल. किती काळ अजून थांबायचे? अधिकार असला तरी त्याला काहीतरी काळ-वेळ असला पाहिजे. हा निर्णय राज्यपालांच्या हातात आहे. 

बारामतीत डझनभर पिस्तुले जप्त; पिस्तुलांचं MP कनेक्शन आलं उजेडात! 

दरम्यान, आता शेतकरी आदोंलनाबाबत जागतिक पॉपस्टार रिहाना, पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांनीही प्रतिक्रिया देत ट्विट केले. त्यावर भारतातील सेलिब्रिटी देखील प्रत्यूत्तर म्हणून IndiaAgainstPropaganda या हॅशटॅग खाली ट्विटरवर मोहीम चालू होती. याबाबत बोलताना पवार म्हणाले,  ''भारतातील सेलिब्रिटींनी इतके दिवस मत का व्यक्त केले नाही? या आधी त्यांना थंडीत शेतकरी उपोषण करताना दिसले नाही का? जगातील कुठेही माणुसकीला काळिमा फासणाऱ्या गोष्टी घडल्यावर कोणीही मत व्यक्त करु शकतो. आपणही मत व्यक्त करतोच.''

दरम्यान,  पेट्रोल दरवाढीबाबत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने पेट्रोलवरील टॅक्स कमी करण्याची मागणी केली आहे. याबाबत पवार यांनी'आधी केद्र सरकारला टॅक्स कमी करायाला सांगा मग आम्ही विचार करु, अशा शब्दांत सुनावले.

असा करा राष्ट्रीय जेईई मेन्सचा अभ्यास

राज्याचे सामाजिक न्याय आणि विधी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात आता करुणा शर्मा यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यावर त्यांनी या प्रकरणात पोलिस योग्य ती कारवाई करतील. कोणीही हस्तक्षेप करणार नाही. मुंडे यांच्या मुलांचे जाब पोलिसांनी घेतले आहेत. पुढील कारवाई पोलिस करतील, असे म्हटले. 'या आधीही तक्रार दाखल झाली होती. पुन्हा मागे घेतली सर्वांना माहीत आहे. त्या भगिनींना तक्रार करण्याचा अधिकार आहे. आपल्या देशात महिलांना सन्मान दिला जातो. महिलांनी त्या सन्मानचा मान ठेवला पाहिजे.''असेही ते म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com