विरोधाला विरोध करणार नाही - अजित पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar statement will not oppose the opposition but noticed that injustice is being done to state those matters will notice to government

विरोधाला विरोध करणार नाही - अजित पवार

बारामती : सत्तांतरानंतर आता विरोधी पक्ष नेतृत्वाची भूमिका पार पाडायची असली तरी केवळ विरोधाला विरोध कधीच करणार नाही, मात्र ज्या ठिकाणी राज्यावर अन्याय होतोय असे लक्षात येईल त्यावेळेस त्या बाबी सरकारच्या निदर्शनास आणून दिल्या जातील, असे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज बारामतीत सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मिळावे ते बोलत होते. निधी वाटपाच्या बाबतीत झालेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना अजित पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच उदाहरण देत वाराणसी लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या योजनांचा दाखला दिला. निर्णय घेण्याचा अधिकार जिथे असतो तिथे त्यांनी थोडेसे झुकते माप दिले तर त्याबद्दल चुकीचे काही आहे असे नाही, लोक दोन्हीकडून बोलतात.

संधी मिळूनही जर मतदारसंघासाठी काही केले नाही तर तिकडूनही बोलले जाते आणि मतदारसंघासाठी काही केले तर त्यावरही टीका केली जाते, त्यामुळे या टिकेला आपण फारसं महत्त्व देत नाही असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. राज्यामध्ये सत्तांतराचे नाट्य घडत असताना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला होता आणि सर्व आमदारांनी हा निर्णय शेवटपर्यंत पाळला, असे अजित पवार म्हणाले. अडीच वर्षांच्या काळात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या सरकारने चांगले काम केले होते, उद्धव ठाकरे यांच्यावर अडचणीची वेळ आल्यानंतर आम्ही सर्वांनी त्यांच्यासोबत उभे राहण्याचा निर्णय घेतला आणि शेवटपर्यंत आम्ही सोबत राहिलो.

भाजप सेना युतीचे सरकार होते तेव्हा ठाण्यामध्ये झालेल्या सभेत एकनाथ शिंदे यांनीच वैतागून राजीनामा देऊ केला होता, याची आठवण करून देत अजित पवार म्हणाले की, त्या काळात शिवसेनेचे लोक राजीनामे खिशात घेऊन फिरायचे असे दिवाकर रावते सांगत असत. त्या काळात शिवसेनेच्या फक्त 12 आमदारांनाच मंत्रीपदाची संधी मिळाली होती, त्यावेळेस असलेल्या लोकांबरोबरच आताचे मुख्यमंत्री गेलेले आहेत, आता ते नेमके कसे काम करतात ते आपण सर्वजण बघूया.

Web Title: Ajit Pawar Statement Will Not Oppose The Opposition But Noticed That Injustice Is Being Done To State Those Matters Will Notice To Government

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..