esakal | अजित पवारांनी आमदारांची यादी चोरणं कोणती नैतिकता? - चंद्रकांत पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar, Chandrakant Patil

अजित पवारांनी आमदारांची यादी चोरणं कोणती नैतिकता? - चंद्रकांत पाटील

sakal_logo
By
मंगेश कोळपकर : सकाळ वृत्तसेवा

पुणे : "शरद पवारांच्या ड्रॉवरमधून ५४ आमदारांची यादी चोरून राज्यपालांना सादर करणं कोणत्या नैतिकतेत बसतं," असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. अजित पवार यांनी चेष्टा करण्याचा प्रयत्न केला, त्याला आपण उत्तर दिल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे. वाराला प्रतिवार करणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे, असंही पाटील म्हणाले.

हेही वाचा: "शिवरायांचं नौदल धोरण देशाला आजही दिशादर्शक"

"महाराष्ट्र झोपेत असताना एक दिवस राज्यातील सरकार पडेल" असं आपण म्हटल्यावर अजित पवारांनी यावर काहीही बोलण्याची आवश्यकता नव्हती कारण मी त्यांना काही बोललो नव्हतो. परंतु त्यांनी त्यावर आपली चेष्टा करण्याचा प्रयत्न केला म्हणून आता मलाही बोलावं लागलं. शरद पवारांच्या ड्रॉवरमधून चोरून ५४ आमदारांची यादी राज्यपालांना सादर करणे कोणत्या नैतिकतेत बसते, तरीही ते शहाणपणा शिकवतात, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधला.

मराठा आरक्षणबाबतचं अजित पवारांचं विधान दांभिकपणाचं

महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करत आहे, हे अजित पवार यांचं विधान दांभिकपणाचं आहे. या सरकारनं सर्वोच्च न्यायालयात खटला नीट चालवला नाही म्हणून मराठा आरक्षण गमावलं. या सरकारच्या चुका न्यायालयाच्या निकालपत्रात पानोपानी दिसतात. या निकालाच्या विरोधात एक महिन्यात फेरविचार याचिका दाखल करायला हवी होती पण सरकारने उशीर केला. त्यांनी न्या. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली निकालाचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमली. आम्ही महिनाभर जे मुद्दे मांडत होतो, तशाच शिफारशी या समितीने केल्या आहेत, असा दावाही यावेळी पाटील यांनी केला.

संभाजीराजेंच्या नेतृत्वाखालील आंदोलनात भाजप सहभागी

खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासाठी १६ तारखेला कोल्हापुरात आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यांच्या घोषणेचं आपण स्वागत करतो. मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळण्यासाठी होणाऱ्या प्रत्येक आंदोलनाला पाठिंबा देण्याची भाजपची भूमिका आहे. संभाजीराजेंच्या नेतृत्वाखालील आंदोलनातही भाजपा सहभागी होईल, असंही त्यांनी सांगितलं.

loading image
go to top