ajit pawarsakal
पुणे
Malegaon News : शेतीमध्ये अधुनिक टेक्नॉलॉजीसाठी अजित पवारांचे धोरणात्मक निर्णय
माळेगाव साखर कारखाना प्रशासन, बारामती कृषी विज्ञान केंद्र आणि राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला सर्वार्थाने मदत करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
माळेगाव - ऊस शेती आणि शेती पुरक व्यसायात एआय (कृत्रीम बुद्धीमत्ता) सारखे आधुनिक टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांनी शिवारात राबवण्यासाठी पुढे यावे. माळेगाव साखर कारखाना प्रशासन, बारामती कृषी विज्ञान केंद्र आणि राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला सर्वार्थाने मदत करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री व माळेगाव साखर कारखान्याचे अध्यक्ष अजित पवार यांनी केले. यावेळी त्यांनी दत्तात्रेय येळे यांची एक एकर जमिन खरेदी करीत माळेगावचा मी सभासद झाल्याचेही जाहीर केले.