बैलगाडा शर्यतीबाबत स्टंटबाजी सुरु - अजित पवार

कायदा मोडण्याचे काम जर कोणी करत असेल तर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल, केसेस दाखल केल्या जातील, अशी अत्यंत स्पष्ट भूमिका अजित पवार यांनी मांडली.
bullock cart race
bullock cart race sakal

पुणे - बैलगाडी शर्यतीबाबत राज्य सरकारची भूमिका या शर्यती सुरु झाल्या पाहिजेत अशीच आहे, मात्र न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन करता येत नाही, दुसरीकडे बैलगाडा शर्यतीबाबत काही जण स्टंटबाजी करीत आहेत, गेल्या पाच वर्षात त्यांचच सरकार होत, आताही त्यांचच सरकार आहे, पण जनतेची दिशाभूल करण्याच काम सुरु असल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

कोरोना आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते. न्यायालयाने कायदा केलेला आहे, कायदा मोडण्याचे काम जर कोणी करत असेल तर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल, केसेस दाखल केल्या जातील, अशी अत्यंत स्पष्ट भूमिका अजित पवार यांनी बैलगाडा शर्यतीबाबतच्या प्रश्नावर मांडली. स्पर्धा आम्हालाही घेता येतात पण आता जर कायदा केलेला असेल तर राज्य सरकार म्हणून आमच्यासह इतर कोणीही कायदा मोडता कामा नये. दुसरीकडे

बैल हा पाळीव प्राणी म्हणून गणला जायला हवा होता दुर्देवाने तो वनप्राणी म्हणून गणला गेला आहे, त्या मुळे अधिक अडचणी निर्माण झाल्या आहेत, हा प्रश्न केंद्राच्या अखत्यारीतील आहे, त्याचा पाठपुरावा डॉ. अमोल कोल्हे व इतर खासदार करीत आहेत.

bullock cart race
बारामती : रुग्णालयाच्या आवारात उभारलेले १०० खाटांच्या क्षमतेचे मोड्युलर रुग्णालय.

स्थानिक स्वराज्य संस्थांचा निर्णय जिल्हापातळीवर...

नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत महाविकासआघाडी म्हणून लढायचे की स्वतंत्रपणे लढायचे हा निर्णय घेण्याचा अधिकार आम्ही जिल्हा पातळीवर देणार असल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. प्रत्येकाला पक्षवाढीचा अधिकार आहे, केंद्र व राज्य स्तरावर केंद्रीय व राज्यस्तरावरुन निर्णय होतात पण या निवडणूकीत जिल्हा पातळीवर हा अधिकार दिला जाईल. दरम्यान उध्दव ठाकरे, मी, एकनाथ शिंदे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, छगन भुजबळ यांची एकत्रित एक बैठक होणार असून त्यात आम्ही या बाबत चर्चा करु आणि त्या नुसार पुढील व्यूहरचना केली जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com