फडणवीस शुभंकरोती म्हणायचे, तेव्हा पवारसाहेब मुख्यमंत्री होते : धनंजय मुंडे

बुधवार, 11 एप्रिल 2018

पुणे: ''राज्यातील सोळा मंत्र्यांचे नव्वद हजार कोटींचे घोटाळे मी बाहेर काढले, अन्न व पुरवठा मंत्र्यांचा दोन हजार पाचशे कोटींचा तूर घोटाळाही सर्वांसमोर आणला. आज कॅगचा रिपोर्टसुद्धा तसं सांगतो; पण मुख्यमंत्री मात्र तितकेसे पुरावे नाहीत. म्हणून क्लिन चिट देतात'',  असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पुण्यातील हल्लाबोल सभेत बोलताना केला.

भाजप सरकारच्या 'अच्छे दिना'च्या घोषणेवर टीका करताना ते म्हणाले, ''आज गावागावात अच्छे दिनची चेष्टा होत आहे.'' भाजपचे नेते नितीन गडकरी यांनीच अच्छे दिनाच्या घोषणेची काही दिवसांपूर्वी खिल्ली उडवल्याचीही आठवण त्यांनी करून दिली. 15 लाखांचं स्वप्न दाखवून मतं मिळवली 15 पैसे सुद्धा मिळाले नाही कदाचित येत्या
 काही दिवसात प्रत्येकाच्या डोक्यावर15 लाखांचं कर्ज असू शकतं.

भाजपच्या स्थापना दिनानिमित्तच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. फडणवीस तुमचं वय काय तुम्ही बोलता काय, तुम्ही शुभंकरोती म्हणायचे तेव्हा पवारसाहेब मुख्यमंत्री होते अशी खिल्ली त्यांनी उडवली.

Web Title: Ajit Pawar takes a dig at Devendra Fadnavis in Halla Bol campaign