बारामती - माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गांभीर्याने घेतल्याचे चित्र सोमवारी (ता. 2) स्पष्ट झाले. मी कोणावर टीका करणार नाही, पण माझ्यावर कोणी चुकीचे आरोप केले तर मीही शांत बसणार नाही, असा इशाराच त्यांनी विरोधकांना दिला.