पुणे मेट्रोबाबत अजित पवार म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

- मेट्रो हडपसरऐवजी लोणी काळभोरपर्यंत नेण्याबाबत अहवाल सादर करा 

- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अधिकाऱ्यांना सूचना

पुणे : महामेट्रोची कामे योग्य पद्धतीने सुरु आहेत. पुुण्यात त्यासंदर्भात दर आठवड्याला बैठक घेणार आहे. पुढच्या बैठकीत मागील बैठकीतील आढावा घेणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. तसेच चांदणी चौक ते वाघोली दरम्यान मेट्रो सेवा सुरु केली जाणार आहे, असेही ते म्हणाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिवनेरीच्या 'रोप वे'साठी बैठक झाली. या बैठकीनंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, महामेट्रोची कामे योग्य पद्धतीने सुरु आहेत. पुुण्यात दर आठवड्याला बैठक घेणार आहे. पुढच्या बैठकीत मागील बैठकीतील आढावा घेणार आहे. चांदणी चौक ते वाघोली दरम्यान मेट्रो सेवा सुरु केली जाणार आहे. मेट्रोचा विस्तार करणार असून, त्यासाठी निधी तातडीने देणार आहे. मेट्रोसाठी केंद्र सरकारचे पैसे येत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार असल्याने मुख्यमंत्र्यांशी बोलावे लागणार आहे.

अजित पवार यांच्याकडे प्रस्ताव : डॉ. कोल्हे

पुणे मेट्रो हडपसरऐवजी शेवाळवाडी आणि लोणी काळभोरपर्यंत नेण्यात यावी. तसेच स्वारगेट ते हडपसर असाही मार्ग सुरू करण्यात यावा असा प्रस्ताव उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आला. यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना पवार यांनी दिल्याची माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar talked about Pune Metro